भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

खिर्डी येथे ईद-ए-मिलाद निमित्त शांतीपूर्ण शोभायात्रेत हिंदू-मुस्लिम एकतेचे चित्र

खिर्डी.ता रावेर,मंडे टू मंडे न्युज,भिमराव कोचुरे। तालुक्यातील खिर्डी येथे ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त मिरवणुक काढण्यात आली. मिरवणुकीनतंर ‘या अल्लाह जगात शांतता नांदू दे, देशात एकात्मता नांदू दे , देश महासत्ता होवू दे’ अशी प्रार्थना करत प्रार्थना करण्यात आली. सुन्नी जामा मस्जिद व अहेले सुन्नत वल जमाअत व जमात रजा-ए-मुस्तफा खिर्डी तर्फे सकाळी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.


मुस्लिम समाज बांधवांचा सर्वात पवित्र सण ईद-ए-मिलादुन्नबी आज रविवारी साजरा करण्यात आला. यानिमित्त सकाळी नऊ वाजता खिर्डी जामा मस्जिद येथून मिरवणुकीची सुरुवात झाली. त्यानंतर खिर्डी खुर्द मुस्लिम वाड्यातून गावाच्या मुख्य गाव दरवाज्या पासून,गावातील मुख्य मार्गाने नवीन प्लॉट,टावर,नंतर खिर्डी बुद्रुक मध्ये मुस्लिम वाड्यातून होऊन बाबा साहेब आंबेडकर नगर,नवीन प्लॉट तसेच गावातील मुख्य रस्त्याने हजरत कादरी शाह बाबा दरगाह व परत जामा मस्जिद येथे समारोप करण्यात आला. ठिकठिकाणी शोभायात्रेचे स्वागत करण्यात येवून गोड पदार्थाचे वाटप करण्यात आले. मिरवणुकीत सहभागी बांधवांकडून घोषणा देण्यात येत होत्या,

मिरवणुकीपूर्वी कार्यक्रम प्रसंगी निंभोरा पोलीस स्टेशनचे स.पोनि, गणेश धुमाळ, माजी प स सदस्य दिपक पाटील, बुद्रुक येथील सरपंच मधुकर ठाकूर,खिर्डी खुर्द पोलीस पाटील प्रदीप पाटील, खिर्डी बु. माजी पोलीस पाटील अरुण पाटील,प स माजी सभापती घनश्याम पाटील,खिर्डी खुर्द ग्राम सेवक,माजी सरपंच गफूर कोळी,प्रवीण धुंदले,कांतीलाल गाढे, विजय कोळी,विनोद कोळी,उमेश तायडे,सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी देखील सहभाग घेवून मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्यात.या प्रसंगी मस्जिद मुतवल्ली अस्लम शेख,खिर्डी खुर्द ग्राम पंचायत सदस्य अलताफ बेग,झाकीर पिंजारी,साबीर बेग,शेख सलमान,याकूब बेग,तुकडू बेग,अब्दुल पिंजारी,नईम बेग,शेख कय्युम,जाबीर बेग, रफिक बेग,शेख कबीर,शेख फारूक,हाजी वहिद पिंजारी,हाजी महेबूब बेग, शेख शब्बीर,शेख जाबीर,आदी सह मुस्लीम बांधव उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!