अयोध्या येथून आलेल्या “श्रीराम अक्षदा मंगल कलशा” ची आज सावद्यात शोभायात्रा
सावदा ता.रावेर, मंडे टू मंडे न्यूज नेटवर्क| अयोध्या येथून आलेल्या “श्रीराम अक्षदा कलश” शोभायात्रेची सावदा शहराच्या प्रमुख मार्गावरून आज शनिवार रोजी दुपारी साडेतीन वाजता दुर्गा माता मंदिरापासून शोभायात्रा निघणार आहे. या यात्रेत सर्व तरुण-तरुणी, आबालृद्ध नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रभू श्रीराम मंदीर आनंदोत्सव समितीचे संयोजक जे. के. भारंबे, अभय वारके यांच्या कडून करण्यात आले आहे .
ही शोभायात्रा दुर्गामाता मंदिर पासून सुरु होऊन इंदिरा गांधी चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक,गांधी चौक,गवत बाजार, रविवार पेठ,छत्रपती शिवाजी महाराज चौक,वंजार वाडी,मोठा आड, महावीर चौक मार्गे शहराच्या प्रमुख मार्गावर फिरून शोभयात्रेचा समारोप दुर्गा माता मंदिराजवळ होईल.
दिनांक २२ जानेवारी २०२४ सोमवार रोजी श्री क्षेत्र अयोध्या येथे होणाऱ्या रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण तमाम भारतीयांना देण्यासाठी दिनांक १ जानेवारी ते १५ जानेवारी २०२४ दरम्यान विशेष संपर्क अभियान देशभरात राबविण्यात येणार आहे .त्याचे आमंत्रण प्रित्यर्थ घरोघरी जाऊन अक्षदा वाटप करण्यासाठी अयोध्येतून अक्षदा घेऊन अक्षता मंगल कलश शहरात दाखल झालेला आहे. या अक्षता मंगल कलशाची शोभायात्रा शहरातून आज शनिवार दिनांक ३० डिसेंबर २०२३ रोजीदुपारी साडे तीन वाजता दुर्गा माता मंदिरा पासून काढण्यात येणार आहे.या शोभा यात्रेत सर्वांनी सामील व्हावे असे आवाहन सावदा येथिल श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा लोकोत्सव समितीचे संयोजक जे. के. भारंबे व अभय वारके यांनी केले आहे.