निंबोल खून प्रकरणातील आरोपीच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन,आ. चंद्रकांत पाटील यांची ठिय्या आंदोलनास भेट
ऐनपुर,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। रावेर तालुक्यातील ऐनपुर येथील तरुणाचा निबोल शिवारामध्ये दिनांक १४ नोव्हेंबर रोजी खून झाला होता त्या खून प्रकरणातील पोलिसांनी एकास अटक केली होती या खून प्रकरणातील अजून काही आरोपीला अजून अटक झाली नाही त्याला अटक करा अशी ऐनपुर येथील मयत झालेल्या तरुणाची आई, वडील व त्यांची पत्नी, नातेवाईक व संबंधितांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करून बाकी राहिलेल्या आरोपींची तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी केली.
आमदार चंद्रकांत पाटील यांची ठिय्या आंदोलनास भेट आमदार चंद्रकांत पाटील यांनी ठिय्या आंदोलनास भेट देऊन पोलिसांनी सखोल चौकशी करून आरोपींना तत्काळ अटक करावी अशी मागणी फैजपूर चे उपविभागीय अधिकारी कुणाल सोनवणे सपोनि हरिदास बोचरे यांच्याकडे करून आमदार चंद्रकांत पाटील नाशिक विभागाचे डी आय जी, जिल्हा अधीक्षक जळगाव यांच्याकडे फोन द्वारे चर्चा करून पोलीस तपास योग्य पद्धतीने करून संबंधितांना न्याय द्यावा अशी मागणी केली व पोलीस योग्य पद्धतीने तपास न केल्यास लवकरच मोठ्या प्रमाणात आंदोलन करून मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला यावेळेस अफसर खान, छोटू पाटील, वाय डी पाटील बेवन पिंजारी,अल्ताफ बेग,सुनील पाटील व मृतांचे नातेवाईक व नागरीक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते बाकी राहिलेल्या आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली