सेवानिवृत्त शिक्षकाकडून जि.प मराठी शाळेला प्रजास्ताक दिनानिमित्त संगणक संच भेट
खिर्डी, ता रावेर.मंडे टू मंडे न्युज, प्रतिनिधी। रावेर तालुक्यातील रेंभोटा येथे जि . प .मराठी शाळा ही कात टाकण्याच्या वाटेवर असतांना येथील मुख्याध्यापिका सौ भाग्यश्री बेंडाळे यांनी गावातील दात्यांना आव्हान करून लोक वर्गणीतुन शाळे साठी मदत करण्याची विनंती केली .
त्यातुन दाते म्हणुन मागील २६ जानेवारीला श्री ज्ञानेश्वर रामु गाढे यांनी प्रिंटर मशीन दान दिले होते तर आज २६ जानेवारी २३ रोजी . प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन रेंभोटा येथील सेवा निवृत्त शिक्षक श्री .जगन्नाथ जयराम पाटील यांनीही संगणक संच त्यांच्या पत्नी स्व . प्रमिला जगन्नाथ पाटील यांच्या स्मरणार्थ शाळेला भेट म्हणून दिली. ह्या वेळी सर्व प्रथम ध्वजारोहण मुख्याध्यापिका भाग्यश्री बेंडाळे यांच्या हस्ते झाले त्यांनंतर संगणक संच भेट देणारे श्री . जगन्नाथ जयराम पाटील. यांचे सुपुत्र श्री . सुनिल जगन्नाथ पाटील यांचा सत्कार सरपंच पती आनंद सपकाळे यांनी शाल श्रीफळ व पुष्प गुच्छ देवुन करण्यात आला.
तसेच यावेळी सुनिल पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की आपण समाजाचे व देशाचे काही देणे लागतो आणी आपण ज्या शाळेत शीकलो ती शाळा आज शेवटची घटका मोजत आहे आणी तीला नवसंजीवनी देण्यासाठी गावातील दात्यांनी पुढे येवून मदत करावी असे आवाहन सुनील पाटील यांनी केले यावेळी गावातील सर्व मान्यवरांसह सरपंच सपनाताई आनंद सपकाळे, ग्रा प सदस्य सर्व अंगणवाडी सेविका व ग्रा.प कर्मचारी उपस्थीत होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जि प शिक्षक मनोज महाजन यांनी केले .