रावेर तालुक्यात सोळा वर्षीय मुलीवर अत्याचार
रावेर, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। रावेर तालुक्यात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर चार वेळा अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली.
या बाबतबअधिक माहिती अशी की, रावेर तालुक्यातील एक १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह एक गावात वास्तव्याला असून त्याच गावात राहणारा शाहरूख सरवर तडवी याने पिडीत मुलीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर चार वेळा जबरदस्ती अत्याचार केला.परंतु त्यानंतर त्याने तिला लग्नास नकार दिला. सदरील सम्पूर्ण घटना पिडीत मुलीने आपल्या कुटुंबियांना व नातेवाईकांना सांगितला. या बाबत पोलिसस्टेशनला तक्रार दिल्याने रावेर पोलिसस्टेशनला त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी शाहरूख सरवर तडवी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.