भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यरावेर

रावेर मध्ये महिलेने दिला तीन मुलांना जन्म

रावेर,मंडे टू मंडे न्युज ,चंद्रकांत वैदकर। रावेर शहरातील रुग्णालयात एका महिलेने आज दि.२७ एप्रिल रोजी सकाळी एकाच वेळी चक्क तिळ्यांना (तीन मुलांना) जन्म दिला असून तिघेही बाळाची प्रकृती चांगली असून आईचीही प्रकृती सुखरूप आहे.

मिळालेली माहिती अशी की, बहादरपूर येथील माहेर असलेल्या मध्यप्रदेशच्या लालबाग बऱ्हाणपूर येथील राहणारी कविता राजकुमार कापडे याना रावेर शहरातील माऊली हॉस्पिटल डिलिव्हरी करिता दाखल केले असता महिलेने (तिळ्यांना) तीन मुलांना जन्म दिला . सकाळी १० वाजून ४५ मिनिट पहील्या बाळाची जन्म वेळ असून, दुसऱ्या बाळाची जन्मवेळ १० वाजून ५० मिनिट, तर १० वाजून ५५ मिनिटांनी तीस-या बाळाची जन्मवेळ आहे. बाळांची आई कविता राजकुमार कापडे हि सुखरूप असून तीनही बाळाची प्रकृती उत्तम आहे.

स्त्रीरोग तज्ञ डॉ संदीप पाटील व डॉ.योगिता पाटील यांनी नॉर्मल डिलिव्हरी केल्याने तिन्ही बाळ व त्याची आई या सर्वांची प्रकृती अतिशय उत्तम आहे, राजकुमार दिलीप कापडे व नातेवाईक यांनी माऊली हॉस्पिटल चे डॉ संदीप पाटील व डॉ.योगिता पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!