तापी नदीपात्रात इलेक्ट्रिक मोटरचे काम करताना शॉक लागून तरुणाचा मृत्यू
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज,प्रतिनिधी। रावेर तालुक्यातील पुरी गोलवाडे शिवारातील तापी नदी पात्रात १ ऑक्टोंबर २२ रोजी संध्याकाळी ५.०० वाजेच्या सुमारास पुरी गावातील रहिवाशी शुभम विजय गोंड वय (२४) हा युवक इलेक्ट्रिक मोटर चे काम करीत असताना अचानक शॉक लागून पाण्यात बुडून मृत स्थितीत आज सकाळी ११.०० वाजताच्या सुमारास अथक प्रयत्न करून ज्ञानेश्र्वर बेलदार यांनी पाण्यात उतरून सदर इसमाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
पुरी गावातील पोलिस पाटील किरण पाटील यांनी निंभोरा पोलिस स्टेशनला खबर दिल्याने अकस्मात मृत्यू २१/२२ सीआरपीसी १७४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ग्रामीण रुग्णालय रावेर येथे शवविच्छेदन करून प्रेत नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. निंभोरा पोलिस स्टे.चे स.पोनि श्री.गणेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा पुढील तपास पो.हे का.गणेश सुर्यवंशी,पोलिस नाईक ईश्वर चव्हाण हे करीत आहे.