रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे अल्पवयीन मूलीवर अत्याचार
ऐनपुर,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज,विजय के अवसरमल। रावेर तालुक्यातील ऐनपुर येथील एका चाळीस वर्षीय व्यक्तीने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना ऐनपुर शिवारात घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की ऐनपुर ता रावेर येथे दिनांक १७ रोजी १२ वाजेच्या सुमारास आरोपी नितीन मधुकर पाटील वय ४० याने व सहकारी महिला वय ३० यांनी संगनमत करून पीडित अल्पवयीन मुलीला आरोपी नितीन पाटील यांचे ऐनपुर शिवारातील शेतात काड्यावेचण्याच्या उद्देश्याने महिला आरोपीने बोलावून आरोपी नितीन पाटील याने आश्लील बोलून सदर पीडित बालिकेवर जबरदस्ती ने अत्याचार केला या बाबत निंभोरा पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने दोघ आरोपी विरुद्ध भाग ५ गु.र.नं. १७०/२२ भादवी कलम ३७६ , तसेच बालकांचे लैंगिक अत्याचार कायदा अधिनियम कलम ४,६ तसेच अनु. जाती जमाती कायद्यानव्ये गुन्हा दाखल झाला असून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे . पुढील तपास जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली फैजपूर पोलीस उपविभागीय अधिकारी कुणाल सोनवणे तपास करीत निंभोरा पोलीस स्पोनी गणेश धुमाळ करीत आहेत.