पूनखेडा – पातोंडी रस्त्याच्या साईड पट्ट्या नसल्याने अपघात
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। रावेर आणि मुक्ताईनगर या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्याला पूनखेडा ते पातोंडी या दरम्यान साईड पट्टी नसल्यामुळे वाहन धारकांना साईड देताना अगदी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
तसेच आज संध्याकाळी ५.३० वाजेच्या सुमारास रावेरहून पातोंडी गावाकडे जाणारी टाटा मॅजिक गाडी समोरून आलेल्या ट्रकला साईड देत असताना साईड पट्टी अभावी गाडी गटारीत घसरली असून सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.
या घटनेची माहिती पूनखेडा येथील ग्रामस्थांना मिळाल्यानंतर त्यांनी लागलीच घटना स्थळी जावून ट्रॅक्टरच्या साहाय्याने गाडी सुखरूप बाहेर काढण्यात आली आहे. या रस्त्यावर अपघात होवून बळी जाण्याची सा.बा.विभाग वाट तर पाहत नाही ना?असा प्रश्न नेहमी पडत आहे तसेच या रस्त्यावरील साईड पट्टी चे काम त्वरित सुरू करावे अशी मागणी ग्रामस्थांसह वाहनधारकांनी केली आहे.