निंबोल खून प्रकरणातील आरोपीला अटक
ऐनपूर, ता रावेर,मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। रावेर तालक्यातील निंबोल शिवारात एक २७ वर्षीय तरुणाचा खून झाल्याची घटना दि १४ रोजी दुपारी ४ वाजे सुमारास घडली होती ज्यामुळे परीसरात एकच खळबळ उडाली होती,त्या घटने नंतर घटना स्थळी श्वानपथक,फॉरेन्सिक,तसेच पोलिसांचा मोठाफौज फाटा तपासला लागला होता.
स्थानिक पोलीस व एलसीबीचे पथकाने मध्य प्रदेशातील माफिपालिया पाडा तालुका नेपानगर जि बुऱ्हाणपूर येथून आरोपी अर्जुन नरसिंह भिल्ल वय -४० याला अटक करण्यात आली आहे.घेतले. आरोपीने गुन्हाची कबुली केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. कौटुंबिक वादातून खून केल्याची माहिती मिळत असून गेल्या तीन दिवसांपासून आरोपीचा शोध सुरू होता आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले. या कारवाईत जळगाव पोलिस अधिक्षक ए राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नजन पाटील, फैजपूर विभाचे उपपोलीस अधिकारी कुणाल सोनावणे, यांच्या मार्गदर्शनाखाली निंभोरा पोलिस स्टेशन चे स.पो नि गणेश धुमाळ, उप पोलीस निरीक्षक काशिनाथ कोळंबे, रा.का.पाटील,किरण जाधव, रिजवान पिंजारी, स्वप्नील पाटील, ज्ञानेश्वर चौधरी, ईश्वर चौहान,सुरेश अढागडे यांचा सहभाग होता.