रावेर येथे ३० घरांवर वीज चोरी प्रकरणी कारवाई
रावेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। वाढीव वीज मागणीने त्यातल्या त्यात राज्यात पुरेसा कोळसा उपलब्ध होत नसल्याने राज्यात भारनियमन होत आहे,असे असताना वीज चोरांच्या विरोधात धडक मोहीम राबवण्याचा निर्णय घेतल्याने महावितरण कंपनीतर्फे वीजचोरी विरोधात राज्यव्यापी मोहीम राबविली जात आहे. याच पश्वभूमीवर आज रावेर येथे ३० घरांवर वीज चोरी प्रकरणी कारवाई करण्यात आली.
वीज वितरण कंपनीचे सावदा येथील कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे याच्या आदेशानुसार व येथील उपकार्यकारी अभियंता अनिल पाटील यांच्या मार्गदर्शना खाली सहायक अभियंता दिलीप सुंदराणी व प्र तंत्रज्ञ बी.सी साळुंके यांनी आज विज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांसोबत रावेर येथें ३० घरी वीज चोरी पकडून साहित्य जप्त केले.
यापुढे अशीच कारवाई सुरू राहणार असल्याचेही सांगण्यात आले. सोबत उत्तमगिर गोसावी ,कलींदर तडवी, तुषार चौधरी,अरुण माळी, दीपक पाटील,धनंजय पाटील, अमोल हिवरे,सतिष सांगळे, चेतन भारते, अरुण माळी, कल्पेश पाटील, समीर तडवी, नजरखान जाबिरखान हे होते.