रावेर शहरात वीज चोरांवर कारवाई
रावेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। रावेर शहरातील मदिना कॉलनीमध्ये महावितरण तर्फे विजचोरी करणाऱ्या १३ जणांविरोधात मोहीम राबवत महावितरणच्या पथकाने कारवाई केली.
रावेर शहरात विज चोरी करणाऱ्यां विरुध्द महावितरण विभागातर्फे मोहीन राबवण्यात आली. महावितरणचे उप कार्यकारी अभियंता अनिल पाटील यांच्या मार्गदर्शना खाली मदिना कॉलनीत विजेची चोरी करणाऱ्या १३ जणांविरोधात कारवाई करून दंड देण्यात आकारण्यात येऊन मीटर जप्त करण्यात आले. शहरात ही मोहीम अशिच सुरु राहील कोणीही विज चोरी करू नये, असे अवाहन साहय्यक अभियंता दिलीप सुंदराणी यांनी केले आहे. यावेळी पथकामध्ये समीर तडवी, देवेंद्र महाजन, संतोष जाधव व इथर कर्मचारी सतीश चौधरी, भिका साळुंखे, अमोल हिवरे, धनंजय पाटील, चंद्रकांत ठाकूर, चेतन भरते,दिलीप कोष्टी, अरुण माळी, कल्पेश पाटील, महेश चौधरी यांचा समावेश होता.