भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरशैक्षणिक

आ.गं हायस्कूल व ना. गो. पाटील महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

सावदा, ता.रावेर, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। सावदा येथील श्री आ.गं हायस्कूल व नामदेवराव गोमाजी पाटील कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा दिनांक 7/2/2023 रोजी अतिशय उत्साहात पार पडला. सदर समारंभाच्या अध्यक्षस्थानी मा. कैलास कडलग, उपविभागीय अधिकारी (फैजपूर विभाग) पारितोषिक वितरक श्री. किशोर चव्हाण मुख्याधिकारी नगरपालिका सावदा, त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून श्री. जालिंदर पळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सावदा पोलीस स्टेशन हे होते.

सदर प्रसंगी मनोजकुमार वसंतराव पाटील, राजेंद्र चौधरी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष परीक्षित शरद वाणी व पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष दुर्गादास धांडे, सेवानिवृत्त शिक्षक अनिल मदन वाणी, आप्पा वाणी व इतर बरेच पालक या समारंभास उपस्थित होते. सदर प्रसंगी दीप प्रज्वलन करून व सरस्वती मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून समारंभाचे उद्घाटन माननीय श्री कैलासजी कडलग यांच्या हस्ते झाले. तदनंतर आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे विद्यालयाच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला. सदर स्वागत व सत्कार माननीय प्राचार्य श्री सी. सी. सपकाळे व पर्यवेक्षक जे.व्ही. तायडे यांनी आपल्या शुभहस्ते संपन्न केला.


प्रांताधिकारी कैलासजी कडलक यांनी विद्यार्थ्यांना कॉपीचे दुष्परिणाम काय होतात यासंदर्भात गंभीर इशारा दिला. त्याचप्रमाणे कॉपी करणाऱ्याचे भविष्य हे अंधःकारमय असते असा गर्भित इशारा इयत्ता दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना दिला. तसेच आपल्याला आपल्या जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचे असेल तर शरीर सुदृढ असले पाहिजे असा मोलाचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या अध्यक्षीय मनोगतातून दिला.


त्याचप्रमाणे मुख्याधिकारी श्री किशोर चव्हाण यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना पारितोषिकाचे मूल्य समजावून सांगितले .पारितोषिक एक रुपयाचे असो वा एक लाखाचे त्या दोघांचे मूल्य व त्या मागच्या भावना या समान असतात पारितोषिकाचे मूल्य त्याच्या किमतीवरून करू नये. असे विचार त्यांनी प्रकट केले,


तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांनी आपल्या मनोगतामध्ये नगरपालिकेच्या व जिल्हा परिषदांच्या शाळा इतर शाळेच्या तुलनेत कुठेही कमी नाही. उलट पक्षी या शाळांच्या,आपल्या मराठी शाळांच्या शिक्षक वर्गाकडे अनुभव संपन्नता जास्त असते त्यामुळे ते विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त देत असतात. असे विचार त्यांनी प्रकट केले.


तदनंतर पारितोषिक वितरण करण्यात आले सदर पारितोषिक वितरण मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांच्या शुभहस्ते पार पडले .इयत्ता दहावी इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेमध्ये प्राविण्य व यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. त्याचप्रमाणे वर्षभरामध्ये विविध शालेय उपक्रम राबविले जातात. त्यामध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना दानशूर दात्यांनी ठेवलेल्या अनामत रकमेच्या व्याजातून हे पारितोषिक वितरण करण्यात आले.

याप्रसंगी शाळेचे विविध उपक्रमांविषयी संजय महाजन यांनी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नंदू पाटील यांनी केले सदर समारंभ संपन्न झाल्यानंतर इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना त्याच सभामंडपात निरोप देण्यात आला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!