प्रलंबित मागण्यांसाठी ऐनपुर महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संपावर
ऐनपुर,ता.रावेर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी आपल्या प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी सोमवार ( दि. २०फेब्रूवारी ) पासून संपावर गेले आहेत हे आंदोलन मंगळवार पर्यंत संपुष्टात न आल्यास त्याचा परिणाम परीक्षांवर होणार आहे त्या स्थगित होऊ शकतात
जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी विविध मागण्यासाठी शिक्षेकेतर कर्मचाऱ्यांनी महाविद्यालयाचे प्रवेशद्वारावर कामबंद आंदोलन करत संप सुरू केला आहे.
ऐन परीक्षेच्या काळात कर्मचारी संपावर गेल्याने महाविद्यालयात गैरसोय पहायला मिळाली
ऐनपुर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात आजपासून शिक्षेकेतर कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे यात कर्मचारी शासनाच्या उदासीन धोरणांच्या निषेधार्थ प्रलंबित असलेल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेमुदत संपात सहभागी झाले आहेत.
आंदोलकांच्या वतीने महाराष्ट्र राज्य विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संयुक्त कृती समिती राज्य सरकारशी चर्चा करीत आहेत पण सकारात्मक निर्णय लेखी स्वरूपात मिळत नसल्याने संप सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला आहे यावेळी उपस्थित कर्मचारी संघटनेचे जी.एस. महाजन,पी.व्ही. महाजन, एस.के.चौधरी, पी.टी. पाटील,बी.आर. पाटील,एन.पी. महाजन,जी.एन. पाटील,एस.के, पाटील,एम.डी. महाजन उपस्थित होते कर्मचाऱ्यांच्या संपाला संस्थेचे संचालक, प्राध्यापक, डॉक्टर यांनी भेट देऊन संपाला पाठिंबा दिला