भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यरावेर

ऐनपुर प्राथमिक आरोग्य केंद्र रामभरोसे, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी नसल्याने गैरसोय

ऐनपुर,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज, विजय के अवसरमल। रावेर तालुक्यातील ऐनपुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत सात उपकेंद्रात आरोग्य सेवा पूरवणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात वर्ग १ आणि वर्ग २ अशी वैद्यकीय अधिकारी दोन पदे गेल्या वर्षभरापासून रिक्त आहेत सध्या लोहारा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ व्ही.डी.महाजन यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त कार्यभार आहे शिवाय इतरही कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने ऐनपुर प्राथमिक आरोग्य केंद्रच रामभरोसे असल्याचे चित्र दिसत आहे.

ऐनपुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत सात उपकेंद्र आहेत त्यापैकी धामोडी, विटवा,पातोंडी, खिरोदा प्र रावेर उपकेंद्रात चार आरोग्य सेविकांचे पदे रिक्त आहेत तसेच आरोग्य केंद्रांतर्गत शिपायांची दोन आरोग्य सहाय्यक ( हिवताप कार्यालय ) ऐनपुर चे एक पद रिक्त आहे उपकेंद्रात आरोग्य सेवक व आरोग्य सेविकांचे प्रत्येकी एक पद रिक्त आहेत त्यामुळे ऐनपुर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सर्व उपकेंद्रातील एकुण ४६ हजार ६०० लोकसंख्येच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे प्रभारी राज व रिक्त पदांमुळे लसीकरण, कुटुंब कल्याण कार्यक्रम राबविताना अडचणी येतात प्रामुख्याने रात्री अपरात्री सर्पदंश, प्रसुती किंवा अपघातातील जखमी रुग्ण आल्यास एकही कायमस्वरूपी डॉक्टर नसल्याने गैरसोय होते विशेष म्हणजे ऐनपुर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गतच्या ७ उपकेंद्रात मंजूर ८ पैकी दोन आरोग्य सेविका कार्यरत आहेत,
या ठिकाणी कायमस्वरूपी निवासी वैद्यकीय अधिकारी यांची नेमणूक करण्यात यावी अशी ऐनपुर परीसरातून मागणी होत आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!