भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

अजंदे रेल्वे बोगदा रस्ता हरवला खड्डयात

खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज, प्रतिनिधी। रेल्वे विभागा कडून करण्यात आलेल्या अजंदा रावेर रेल्वे पुलाच्या नव्या बोगदया खालून जाण्याऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.या रस्त्यावर जवळपास संपूर्ण रस्ता काटेरी झुडपांनी व्यापलेला आहे त्यामुळे वाहन धारकांना वाहन चालवताना समोरील वाहनाचा अंदाज येत नाही त्यामुळे वाहन धारकांनमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे

रावेर तालुक्यातील ऐनपूर, निंबोल, खिर्डी,अजंदयासह परिसरातील प्रवाशांना तसेच शेतकऱ्यांना आपली केळी रेल्वे स्टेशन व्हॅगन वर पोहोच करण्यासाठीचा हा एकमेव मार्ग आहे, वाहनधारकांना तालुक्यावर ये-जा करण्यासाठी रेल्वे बोगद्यातून जावे यावे लागते.या रस्त्यावरील कॉंक्रीटीकरण व डांबरीकरण पूर्णपणे उखडले गेले असल्याने या रस्त्यात मोठमोठाले खड्डे (एक ते दिड फूटाचे) पडल्याने वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन जावे लागते.

त्यात आधीच रस्ता नागमोडी असल्याने मोठया अपघाताची शक्यता बळावली आहे. रस्त्याने पायी चालणे सुद्धा कठीण झालेले आहे.सदरच्या रस्त्यावरून प्रवाशी वाहने,शेतकरी शेतमजूर वर्गाची मोठी वर्दळ असते.रेल्वे बोगदया जवळच मोठा गड्डा असल्याने .रेल्वे विभागाच्या निकृष्ट दर्जाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून लोकप्रतिनिधीही याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.तरी तातडीने समस्या सोडविण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!