असाही वाढ दिवस : केक न कापता टरबूज कापून शेतकरी हिताचा संदेश
सावदा, ता.रावेर, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। सध्या समाजात वाढदिवस म्हटला की समोर येतो फँन्सी केक. तो ही महाग पण केक न कापता त्याच पैशाची फळे आणुन वाटप करून वाढदिवस साजरा करा असे आवाहन माणुसकी समूहातर्फे रावेर तालुक्यातील मोठे वाघोदा येथील रहीवाशी तथा पत्रकार व समाजसेवक कमलाकर माळी यांनी केले आहे.
दरवर्षी ते विविध उपक्रम राबवितात पण यावेळी त्यांनी वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. हा वाढदिवस परीवासोबत औंक्षण करुन ज्युनियर चार्ली समाजसेवक सुमीत पंडीत सोबत टरबुज कापुन वाटुन साजरा केला व शेतकरी हिताचा संदेश या वाढदिवसाच्या निमित्ताने आज देण्यात आला.केक कापण्याचा सध्याचा ट्रेंड पाहता केक न कापता फळे कापून वाढदिवस साजरा करण्याची संकल्पना अगदीच रास्त अभिनंदनीय आहे.
लहान मुलांपासून १०० ते वर्षांच्या आजोबांपर्यंत आबालवृद्धांची वाढदिवस थाटात साजरा करण्याची सध्या फॅशन चालू आहे गल्लीबोळात सारी पोरही आपल्या मित्राच्या वाढदिवशी केक कापून फोटो सोशल मीडियावर व्हायरल करीत असतात.
सामाजिक राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचे वाढदिवस साजरे केले जात असतात पण आता मात्र गल्लीपासून दिल्लीपर्यंत वाढदिवसा निमित्ताने केक
कापणे मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे. एवढा महाग केक कापल्यावर थोडा केक खायचा आणि बाकीचा सत्कारमूर्ती च्या तोंडाला लावायचा आणि बाकीचा फेकून द्यायचा अस चित्र सध्या दिसते. केक शरीराला दुष्परिणामकारक तर आहेच यात काही प्रमाणात केमिकलचा
उपयोग केलेला असतो. तरी आपला वाढदिवस केक न – कापता फळे कापून साजरा करा म्हणजे आपला शेतकरी जगेल.. या अनुषंगाने समाजसेवक पत्रकार कमलाकर माळी यांच्या तर्फे असे आव्हान करण्यात आले आहेत. वाढदिवस निमित्ताने आतापर्यंत त्यांनी रक्त दान
शिबिर, आरोग्य शिबिर, व्याख्यान.जनजागृती अभियान ग्राम स्वच्छता अभियान.गावकऱ्यांसाठी मोफत वाचन कट्टा असे सर्व उपक्रम स्वखर्चाने गावात राबवले आहेत.