भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरशैक्षणिकसामाजिक

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव ; ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल महाविद्यालयात मॅरेथॉन स्पर्धा

ऐनपूर,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज,विजय के अवसरमल। रावेर तालुक्यातील ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या विद्यार्थी विकास विभाग आणि महाविद्यालयातील क्रीडा व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव वर्षानिमित्त आणि मेजर ध्यानचंद याच्या जयंती निम्मिताने मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली.

या मॅरेथॉन स्पर्धेत २४५ पुरुष आणि महिलांनी सहभाग नोंदवला. यात पुरशांसाठी ५ कि.मी. आणि महिलांसाठी ३ कि. मी. एवढ्या अंतराचे नियोजन होते. मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भागवतपाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख वक्ते म्हणून स्पर्धेसाठी लागणारे टी-शर्ट चे प्रायोजक वैष्णवी फर्टिलायझर चे संचालक राहुल पाटील हे होते. या स्पर्धेसाठी ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन श्रीराम नारायण पाटील, सचिव . संजय वामन पाटील, आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी स्पर्धकांचा उत्साह वाढविण्यासाठी उपस्थित होते.


या स्पर्धेत महिलांमधून प्रथम क्रमांक कु. प्राचल विनोद कोळी, द्वितीय क्रमांक कु. साक्षी विजय कोळी तृतीय क्रमांक कु. समीक्षा रामकृष्ण सपकाळे तसेच पुरुष गटा मधून प्रथम क्रमांक मालखेडे सुदेश दिलीप, द्वितीय क्रमांक योगेश सुनिल कोळी तृतीय क्रमांक देवेंद्र लीलाधर तायडे यांनी पटकावला.

महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभाग व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते. या सर्व विजेत्यांना सम्मान चिन्ह (ट्रॉफी) देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे आयोजनासाठी ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष . भागवत पाटील, चेअरमन श्रीराम नारायण पाटील, सचिव . संजय वामन पाटील, संस्थेचे सर्व पदाधिकारी व ऐनपूर येथील प्रार्थमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सिद्धेश रवींद्र पाटील व डॉ. विवेक अरुण पाटील तसेच आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने तसेच महाविद्यालयातील क्रीडा समिती सदस्य आणि क्रीडा संचालक डॉ. एस. एन. झोपे, डॉ के जी कोल्हे, डॉ आर व्ही भोळे, डॉ एस एन वैष्णव, डॉ जे पी नेहेते, डॉ डी बी पाटील,प्रा एस आर इंगळे, प्रा साईनाथ उम्रीवाड,प्रा विनोद रामटेके, डॉ पी आर गवळी,पुजा कुमावत, नरेंद्र मुळे, प्रदिप तायडे, अक्षय महाजन,काजल महाजन, अंकुर पाटील, ज्ञानेश्वर कोळी, आणि महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कठोर परिश्रम घेतले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!