बलवाडी रस्त्यावर चाकूचा धाक दाखवत दुचाकीस्वारास लुटण्याचा प्रयत्न, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज, प्रतिनिधी। भुसावळ येथील प्रवीण सोपान कोळी वय (३८) रेल्वे कर्मचारी ड्युटी संपवून बुधवार ८ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्री ९.२५ वाजेच्या सुमारास एम एच १९.डिपी ८९०८ या पल्सर गाडीवर ऐनपुर येथे सासरवाडीला जात असताना खिर्डी बलवाडी रोडवर दत्त मंदिराच्यापुढे असलेल्या एस कॉर्नर जवळ अज्ञात चोरट्यांनी चाकू व काठीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
तसेच त्यांच्या ताब्यातील पल्सर गाडीची चावी काढून मोटरसायकल पळविण्याचा प्रयत्न करत असताना सदर प्रकार लक्षात आल्याने त्यांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा मोटरसायकल चोरीचा प्रयत्न फसला.या घटनेची माहिती निंभोरा पोलिसांना मिळताच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन परिसराची पाहणी करून घटनेमध्ये वापरण्यात आलेले हत्यार पोलिसांनी जप्त केले आहे.तसेच या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.