भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

पुराचे पाणी घरात घुसल्याने वृद्धाचा बुडून मृत्यू , एकाचा पुरात वाहून मृत्यू, एक बेपत्ता

रावेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। काल बुधवारी झालेल्या पावसामुळे रावेर शहरातील नागझिरी नदीला आलेल्या पुराचे पाणी घरात घुसल्याने या पाण्यात बुडून एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर तालुक्यातीलच मोरव्हाल येथील एकाचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला असून पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने एक जण बेपत्ता आहे.

बुधवारी रात्री रावेर तालुक्यात व मध्यप्रदेशात मुसळधार पाऊस झाला. यामुळे सुकी, नागझिरी, अभोडा येथील नदीला पूर आला. या पुरात तीन जण वाहून गेले असून त्यापैकी दोघांचे मृतदेह मिळून आले.  तर वाहून गेलेल्या एकाचा शोध घेण्या साठी मोहीम सुरू करण्यात आली या मोहीमेला १२ तास उलटूनही बेपत्ता व्यक्तीचा शोध लागलेला नाही.

नागझिरी नदीला आलेल्या पुराचे पाणी शहरातील नदी काठावर राहणाऱ्या नागरिकांच्या घरात घुसले. घरसमान ओला होऊ नये म्हणून सुरक्षित स्थळी हलविताना एका ५५ वर्षीय वृद्धाचा बुडून मृत्यू झाला आहे. तालुक्यात २४.४२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. १४५ घरांचे नुकसान झाले असून २० गुरे वाहून गेली आहेत. शहरातून जाणारा जुना सावदा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तहसीलदार बंडू कापसे, रावेर पोलिसस्टेशनचे एपीआय आखेगावकर शोध मोहिमेवर लक्ष ठेवून

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!