क्राईमरावेर

फिरण्यासाठी गेलेल्या वृध्दाचा अज्ञात वाहनांच्या धडकेत मृत्यू !

मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।

रावेर, मंडे टू मंडे वृत्तसेवा : येथील एक वयोवृद्ध रात्री बर्‍हाणपूर -अंकलेश्‍वर महामार्गावरून पायी फिरण्यासाठी गेले असता अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

याबाबत वृत्त असे की, शहरातील अष्टविनायक नगर येथील रहिवासी शिवाजी नारायण सोनवणे वय-६१ हे बुधवारी रात्री ८:२५ वाजेच्या सुमारास जेवणानंतर बर्‍हाणपूर-अंकलेश्‍वर महामार्गावर पायी फिरावयास गेले असतांना शहरातील गुलमोहोर हॉटेल समोर बर्‍हाणपूर कडे जाणार्‍या अज्ञात वाहनाने मागुन धडक दिल्याने सोनवणे हे गंभीर जखमी झाल्यानें त्यांना लागलीच उपचारार्थ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचार सुरु असतांना त्यांचे निधन झाले. याप्रकरणी योगेश कन्हैय्या मराठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन धारक विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!