तासखेडा येथिल आंगणवाडी घाणीच्या विळख्यात
तासखेडा,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। रावेर तालुक्यातील तासखेडा येथिल आंगणवाडी ही चहोबाजूने घाणीच्या विळख्यात सापडलेली आहे. एका बाजूने सार्वजनिक पाण्याचा हौद तर त्याच्याच बाजूला सार्वजनिक महिला शौचालय त्याच ठिकाणी पडलेला घान कचरा याचा परिणाम लहान मुलांच्या आरोग्यावरती होत आहे.
आंगणवाडी परिसरात कचऱ्याचे तसेच शेणाचे उकीरडे असुन त्यातुन दुर्गंधी तसेच डासांची उत्पत्ती होवून लहान मुलांच्या आरोग्याशी खेळणे चालू आहे.यात अजुन भर पडली ती म्हणजे नव्याने बांधण्यात आलेल्या सार्वजणीक महिला शौचालयाची. त्यातून सुद्धा अती प्रमाणात दुर्गंधी येत असुन या मुळे लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होण्याचा संभव आहे. आंगणवाडी मध्ये लहान मुलांची संख्या ४३ असुन आज फक्त१० ते१२ मुलांची उपस्थिती आहे. बाकीची मुले ही आजारी पडलेली आहे. अश्या स्वरूपाने आंगणवाडीतील लहान मुलांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार सुरु आहे.होणारा त्रास असाह्य होत असल्याने या बाबत वेळोवेळी ग्रामपंचायतीला तक्रारी केल्यावर सुद्धा ग्रामपंचायतीने आता पर्यत कुठलीही दखल घेतली नाही.
गावातील अस्वच्छतेची परिस्थिती ही ” जैसे थे ” असुन त्यात पावसाळा असल्यामुळे रोगराई ही पसरण्यास पोषक असे वातावरण निर्माण झाले असुन ही आरोग्यासाठी खुप मोठी धोक्याची घंटा आहे.