नौदलात देशसेवा करून अनिल डी गाढे स्वगृही ; रावेर मध्ये स्वागत
रावेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। भारतीय नौदलात पंधरा वर्ष देशसेवा करून आपल्या गावी परतलेले रावेर तालुक्यातील विवरे खुर्द येथील रहिवाशी अनिल ज्ञानदेव गाढे हे आपल्या गावी परतले. त्यांचे रावेर येथे जंगी स्वागत करण्यात आले.
विवरे खुर्द गावचे मूळ रहिवाशी अनिल ज्ञानदेव गाढे हे जुलै २००७ मध्ये भारतीय नौदलात मेडिकल ब्रांच ला कार्यरत होते. पंधरा वर्ष एक महिने त्यांनी देशसेवा केली. यात चिल्का, हैदराबाद,मुंबई, विशाखापट्टनम,अंदमान निकोबार व कर्नाटकातील कारवार या ठिकाणी त्यांनी देशसेवा केली.
अनिल डी गाढे यांनी दहावी पर्यंतचे शिक्षण श्री ग.गो. बेंडाळे हायस्कूल,विवरे याठिकाणी केले तर पुढील बारावी पर्यंतचे शिक्षण सरदार जी. जी.हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज,रावेर येथे घेतले होते. पंधरा वर्ष एक महिन्यांची देशसेवा व कर्तव्यपूर्ती करून अनिल डी गाढे शुक्रवार दिनांक २ सप्टेंबर २०२२ रोजी रावेर येथे परतले आहेत. कुटुंबातील सदस्यांकडून त्यांचे औक्षण केले. तसेच रावेर शहर वासियांनी,मित्र परिवाराने त्यांचेवर पुष्पांचा वर्षाव करून त्यांचे अभिनंदन केले.