पशुधन पर्यवेक्षक डॉ.आसाराम बारेला यांची रायपुर ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून नियुक्ती
तासखेडा. ता. रावेर. मंडे टू मंडे न्युज. अनिल इंगळे। रावेर तालुक्यातील रायपुर येथिल ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच व तिन सदस्य असे एकुण पाच जनांना शासकीय जागेत अतिक्रमण केल्याच्या कारणाने अपात्र ठरवण्यात आले होते. त्या मुळे गहूखेडा येथील डॉ,आसाराम बारेला यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
बरेच दिवस प्रतिक्षेत असलेल्या ग्रामपंचायतीवर अखेर पशु वैद्यकीय दवाखाना श्रेणी-२ गहुखेडा येथिल डॉ. आसाराम बारेला यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश गट विकास अधिकारी रावेर यांनी दिले असता. आज रोजी डॉ. बारेला यांनी रायपुर ग्रामपंचायतीच्या प्रशासक पदी पदभार स्वीकारला आहे.