सिंगत खून प्रकरणी दुसरा संशयित आरोपी गजाआड
खिर्डी ता रावेर,मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। सिंगत येथे दगडाने ठेचून तसेच ज्वलशील पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न करत खून जरून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला होता प्रकरणातील दुसऱ्या आरोपीला सुद्धा निंभोरा पोलिसांनी अटक केली आहे.
- महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांचा झंझावात, ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत
- वीस हजारांची लाच घेताना वायरमनला एसीबी कडून अटक, जळगाव जिल्ह्यातील घटना
- मोठी बातमी : सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीही झाली स्वस्त
रावेर तालुक्यातील सिंगत येथे दि २५ च्या रात्री सेकम-पिंप्री येथील कैलास भिका पाटील यांचा दगडाने ठेचून तसेच ज्वलशील पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न केलेला मृत्यूदेह आढळला होता ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.नंतर घटना स्थळी फैजपूर विभागीय पोलीस अधिकारी डॉ कुणाल सोनवणे,निंभोरा पोलीस स्टेशनचे स.पोनि.गणेश धुमाळ त्यांच्यासह पोलीस पथक दाखल झाले होते.
या घटनेचा युद्धपातळीवर तपास ही सुरू करण्यात आला होता त्यानंतर निंभोरा पोलिसांच्या पथकाने निंभोरा बुद्रुक ता.भुसावळ येथील संतोष निळू बेंडाळे (वय – ४५) या संशयिताला ताब्यात घेतले होते.तसेच मृतदेहाजवळ जे अजून ओळखपत्र निलेश रमेश निकम (रा. फेकरी, ता. भुसावळ) याचे मिळालेले होते त्याला ही पोलिसांनी अटक केली असून न्यायालयात हजर केले असता त्याला ही पाच दिवसाची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेले आहे.दोन्ही संशयित आरोपींनी गुन्ह्याची कबुली केली असून दोन्ही आरोपी निष्पन्न झाले आहे.या बाबत अजून पोलिसांच्या वतीने तपास सुरू आहे.