रिक्षा चालकांची मनमानी, प्रवाशांची आर्थिक लूट
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। कोरोना महामारीच्या काळात शासनाने लॉकडाऊन केल्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था काही दिवसांकरिता बंद करण्यात आली होती.त्यामुळे नागरिकांना खाजगी वाहनांचा आधार घेवून प्रवास करण्यास पसंती दिली होती परंतु काही दिवसांनी लॉकडाऊन संपुष्टात आले असले तरी काही अवैध रिक्षा चालक आजही प्रवाशांकडून दाम दुप्पट भाडे घेत असल्याचे प्रवाशांची ओरड आहे.
तसेच एसटी भाडे प्रमाणे पैसे दिल्यास काही रिक्षा चालक हे हमरी तुमरी वर येत असून प्रवाशांना वाट्टेल त्या शब्दात उर्मटपणे बोलत असतात असे प्रकार नेहमी घडत असतात.सावदा ते ऐनपूर या मार्गावर चालणाऱ्या एसटी व रिक्षा भाडे खालील प्रमाणे.
१) निंभोरा ते सावदा एसटी भाडे १५ रू, रिक्षा भाडे ३० रू.
२) खिर्डी ते सावदा एसटी भाडे २० रू, रिक्षा भाडे ४० रू.
३) सावदा ते ऐनपुर एसटी भाडे २५ रू, रिक्षा भाडे ५० रु.
अशा प्रकारे सावदा ते खिर्डी,निंभोरा, ऐनपूर या मार्गावर चालणाऱ्या रिक्षा चालकांकडून प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची आर्थिक लूट होत आहे.तसेच वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे या कडे संबंधित विभाग जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप प्रवाशी करीत आहे.तसेच दामदुप्पट भाडे घेणाऱ्या व विना परवाना अवैध ॲपे रिक्षा चालकांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांसह प्रवाशी करीत आहे.