भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

कृषी दूत करणार रावेर तालुक्यातील खिर्डी येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन

खिर्डी,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। रावेर तालुक्यातील खिर्डी येथील व परिसरातील शेतकऱ्यांना शेती विषयी मार्गदर्शन करणार आहेत, डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्याल,जळगाव येथील अंतिम वर्षातील विद्यार्थी पुढील चार महिन्या साठी खीर्डी या गावात राहणार आहेत.

ते शेतकऱ्यांना माती परीक्षण, एकात्मिक कीड नियंत्रण, रोग नियंत्रण, भाजीपाला लागवड, फळबाग लागवड नियंत्रण, शासनाच्या विविध योजना, तसेच महिला बचत गट, इ पीक पाहणी अँप इ.. प्रकारच्या सर्व माहिती व नवीन तंत्रज्ञान कसे आत्मसात करावे या विविध विषयी माहिती देण्यासाठी ग्रामीण जागरूकता कार्यनुभव कार्यक्रम 2023 – 2024 या साठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, कार्यक्रम समनव्यक प्रा. बी. एम. गोणशेटवाड, कार्यक्रम अधिकारी प्रा व्हि. एस.पाटील व संबंधित विषयातील विषय विशेष तज्ञा यांच्या मार्गदर्शनाखाली (१) निखिल अशोक कुलट (२)नानासाहेब श्रीमंत गोरड (३)अनिकेत भास्कर मंडले (४) अकुलेटी रुपेश बाबु (५)ऋषिकेश विठ्ठल मंगळे (६)जयेश किरण कानडजे, हे या गावात दाखल झाले असून. ग्रामपंचायत खिर्डी व सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी गावचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्तीत होते. हा उपक्रम गावकऱ्यांच्या उपस्थित पार पडणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!