तापी परिसरात तब्बल सहा विद्युत मोटार पंप फोडून तांब्याच्या तारांवर चोरांचा डंल्ला
तासखेडा. ता. रावेर. मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील तापी परिसरात सुदगांव या गावामध्ये रात्री अज्ञात चोरांनी तब्बल सहा विद्युत मोटारपंप फोडून त्यातून तांब्याचे तार काढत चोरी केल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये पुन्हा भितीने वातावरण निर्माण झाले आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, तापी काठ परिसरातील सुदगाव येथे चोरट्यांनी शेती विद्युत पंपाच्या सहा मोटारी फोडून त्यातील तांब्याच्या तारा काढून चोरून नेल्याची घटना रात्री घडली, ही तापी परिसरामधील पहीली घटना नसुन या आधीही वेळोवेळी आशा चोरीच्या घटना घडलेल्या आहेत, १) रघुनाथ लंके २) पांडूरंग जनार्दन ३) विश्वास तायडे ४) हेमंत सरपटे ५) गोकुळ कोळी ६) पांडूरंग पाटील या शेतकऱ्यांच्या मोटारी फोडल्या गेल्या असून या चोरीची घटनांमुळे शेतकरी हा पूर्णताहा हवालदील झाला आहे.
सतत होत असलेल्या विद्युत मोटर पंप चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांनमध्ये तसेच नागरिकांमधे प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त होत आहे. चोरट्यांपुढे प्रशासन हतबल झालेल आहे की काय ? चोरट्यांना धाकच उरला नसावा आशा ग्रामस्थां कडून प्रतिक्रिया व्यक्त होत असून तक्रार द्यायची किंवा नाही, तक्रार दिल्यावर सुद्धा काही एक निष्पन्न होत नसल्याने या विचारात शेतकरी होरफडत आहे. या चोरांचा पोलीस प्रशासनाने कायमचा बंदोबस्त करावा अशी तापी परिसरातील नागरिकांनी मागणी आहे.