भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

उदळी ते दुसखेडा रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ट,चौकशीची मागणी

तासखेडा. ता.रावेर.मंडे टू मंडे न्युज,अनिल इंगळे।। उदळी ते दुसखेडा या तापी काठावरील गावांना भुसावळ व सावदा या मुख्य बाजारपेठा असुन या गावांना जोडणारा रस्ता म्हणजे उदळी ते दुसखेडा. सन २०१९ मध्ये रुंदीकरणासहीत डांबरीकरण करण्याचे काम असून कोरोनाचे संकट पसरल्या मुळे या रस्त्याच्या कामाला उशीरा सुरुवात झाली खरी . मात्र ज्या पद्धतीने रस्त्याचे काम पाहीजे, त्या पद्धतीने न होता मनमानी पद्धतीने झाले असुन अधिक चौकशी केली असता असे समजते की, साईड पट्टीचे काम एका ठेकेदाराकडे आणि संपूर्ण डांबरीकरन करणे दुसऱ्या ठेकेदाराला देण्यात आले.


जेव्हा रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे काम सुरू झाले त्या वेळेस खळी व मुरुम कमी वापरून मातीचा वापर जास्त करून साईडपट्या बनवल्या, त्यामुळे साईड पटयावर पहिल्याच पावसात बऱ्याच ठिकाणी गवत उगवले आहे. त्याच बरोबर ऐन पावसाळ्याच्या तोंडावर नव्हे तर पावसातच रस्त्याच्या कामाला सुरुवात केली असता जूना रस्ता न खोदता त्याच रस्त्यावर सौम्य पावसातच डांबराची बारीक चादर पसरवून रस्त्याचे काम करीत असतांना निकृष्ट दर्जाच्या कामाला गहुखेडा ग्रामस्थांनी विरोध करत काम बंद पाडले होते, व जो पर्यंत संबंधित विभागाचे अधिकारी घटना स्थळावळ येवून रस्त्याची पाहणी करणार नाही तो पर्यंत रस्त्याचे काम होवू देनार नाही असा पवित्रा घेतला होता,या बाबतचे वृत्त “मंडे टू मंडे न्युज” ने दिले होते.

या बाबत संबंधित विभागने आश्वासन देवून काम पूर्ण करण्यात आले. रस्त्याचे संपूर्ण काम झाल्यावर सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांचा दौरा या कामाची पाहणी करण्यासाठी वळला नाही,अधिकाऱ्यांनी इकडे धुडकून सुदधा बघितले नाही, त्यामुळे तापी काठच्या लोकामध्ये ठेकेदार तसेच संबंधित अधिकाऱ्या विषयी तिव्र नाराजी निर्माण झाली असून एका महीन्याच्या आत रस्त्यावर खड्डे पडायला सुरवात झाली असुन येत्या चार महीन्याच्या आत रस्ता शोधावा लागेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.या रस्त्यावर जुन्या रस्त्याचे खोदकाम न करता त्याच रस्त्यावर अर्धा ते एक इंचाचा डांबरी थर मारलेला असून आज तेथे बऱ्याच ठिकाणी वरचा पापुद्रा उपडून जुना रस्ता दिसत आहे. या रस्त्याच्या कामाकडे लोकप्रतिनिधी तसेच संबधित अधिकारी वर्ग का फिरकले नाही? किंवा कुठल्याही प्रकारची चौकशी का केली नाही? आर्थिक लाभापोटी तर असे होत नाही ना? अश्या एक ना अनेक प्रश्नाना उधाण आले असून नेमके पाणी कुठे मुरलय याचा शोध घेवून रस्त्याच्या कामाची पाहणी करून दोषींवर कारवाई व्हावी आशी तापी काठच्या लोकांची मागणी आहे.

प्रतिक्रिया
१) सुशिल पाटील सरपंच ,उदळी बु ता.रावेर,.
रस्ता निकृष्ट दर्जाचा झाला असुन रस्त्याच्या कामामध्ये जास्त प्रमाणात माती वापरली गेली आहे.
२) चेतन पाटील .ग्रामपंचत सदस्य तासखेडा .
बांधकाम विभागामार्फत रस्त्याची पाहणी करून दोषीवर कारवाई झाली पाहिजे
३) सुधाकर तायडे, सरपंच गहुखेडा.
रस्ता पुन्हा बनवला गेला पाहीजे रस्ता वर्षभर सुद्धा टिकाव धरणार नाही
४) सौ.नुतन दिलीप तायडे सरपंच ,सुतगाव.ता.रावेर. पावसाळ्यात रस्ता बनवण्याची घाई का केली याचे उत्तर मिळाले पाहीजे रस्ता निकृष्ट दर्जाचा असुन चौकशी झाली पाहीजे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!