तांदलवाडी येथे पत्रकाराच्या सतर्कतेने “शिक्रा” पक्षाला मिळाले जीवदान
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज, प्रतिनिधी। रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालय आवारातील निंबाच्या उंच वृक्षावर पतंगाच्या दोऱ्यात एक सुंदर पक्षी अडकून धडपडत पत्रकार सुमित पाटील यांना त्यांचा घराच्या अंगणातुन दिसला त्यांनी लगेच गावातील ग्रामसेवक, व पक्षी मित्र उदय चौधरी यांना बोलावून घेतले.त्यांनी सांगितले की हा शिक्रा जातीचा पक्षी आहे.
निंबाच्या उंच अश्या फांदीच्या टोकावर पतंगाच्या दोराची पंखाला गाठ पडून सुटकेसाठी शिक्रा पक्षी धडपडत होता.कावळे त्याला चोच मारून त्रास देत आवाज करीत होते , शिक्रा पक्षी फार उंच फांदीवर असल्याने ग्रा पं कार्यालयावर चढून ओम महाजन यांनी आणलेल्या एका पाईपास बांबू बांधून तारेचा हुक बांधला व पक्षी मित्राच्या साह्याने अलगद खाली उतरून पंखाला पडलेल्या दोराच्या गाठी ब्लेड ने अलगद कापून त्यास नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले आहे असे पत्रकार सुमित पाटील यांनी “मंडे टू मंडे न्यूज” प्रतिनिधी शी बोलताना सांगितले.