क्राईमरावेर

रावेर तालुक्यात महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

खिर्डी,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधि।। रावेर तालुक्यातील विवरा बु ते रावेर रोडवर निंभोरा पोलिसस्टेशन हद्दीत एका ३५ वर्षीय महिलेला गावाकडे सोडून देतो म्हणून दुचाकीवरून बसवून नेत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करून विनयभंग केल्याचा प्रकार घडला.

या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की, मुक्ताईनगर तालुक्यातील महिला दि, २२ जुलै रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास विवरा बु ते रावेर रस्त्याने पायी जात असता त्याच वेळी रस्त्याने चिंतामन विक्रम बारेला रा. नाचणखेडा ता. बऱ्हाणपूर व राजेश मुकेश बारेला रा. इंटारिया ता. झीरण्या जि. खरगोर हे दोघे दुचाकीने रस्त्यावरून जात असतांना चल गावाकडे सोडून देतो असे सांगून तिला दुचाकीवर बसविले. त्यानंतर तिला जबरजस्ती शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. परंतु कसे तरी त्यांच्या हातून निसटून महिला निंभोरा पोलिसस्टेशनला पोहचुन तक्रार दाखल केली,त्यानुसार चिंतामन विक्रम बारेला रा. नाचणखेडा ता. बऱ्हाणपूर,व राजेश मुकेश बारेला रा. इंटारिया ता. झीरण्या जि. खरगोर या दोघां विरुद्ध निंभोरा पोलिसस्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!