जेष्ठ पत्रकार, स्वातंत्र्य सैनीक वारस संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब मोरेश्वर राणे याचे निधन
सावदा,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। मूळ सावदा व सध्या जळगाव येथील बाळासाहेब मोरेश्वर राणे, वय ७८ यांचे दि २४ रोजी संध्याकाळी अल्पशा आजाराने निधन झाले, ते जेष्ठ पत्रकार, जळगाव जिल्हा पत्रकार संघाचे माजी सदस्य, स्वातंत्र्य सैनीक वारस संघटनेचे अध्यक्ष, व सावदा येथील साईधाम मंदिराचे विश्वात होते, अनेक समाजिक कार्य सदैव राबविणारे असे समाजसेवक म्हणून त्यांची परिसरात घ्याती होते
ते जळगाव येथील रहिवासी ऍड.रजनीश राणे आणि डॉ.तुषार राणे यांचे वडील होते, त्यांचेवर जळगाव येथील वैकुठंधामात दि २५ रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणारे असून त्यांची अंत्ययात्रा त्यांचे राहते घर जुने जळगाव येथून सकाळी ९ वाजता निघणार आहे,