केळी पीकविमा महाघोटाळा : रावेर तालुक्यातील कोटयावधी रुपये हडप करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा
मंडे टू मंडे न्युज नेटवर्क समूह। रावेर तालुक्यातील कोचुर, रसलपूर, बक्षीपुर, उदळी आशा अनेक गावांसह तालुकभरात अनेक ठिकाणी बोगस कागदपत्रे तयार करून शेतकऱ्यांचे केळी पीक विम्याचे करोडो रुपये हडप केले. काही ठिकाणी कारवाईच्या धाकाने तडजोड करून शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम परत करण्याचे प्रकारही सुरू आहेत.बोगस कागदपत्रे तयार करून शेतकऱ्यांचे केळी पीक विम्याचे करोडो रुपये हडप करणाऱ्यांची चौकशी करून त्यांचेवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.
एकीकडे केळी पीक विमा मिळत नाहीयं शेतकऱ्यांना आमदार, खासदार, मंत्री, पुढारी याना गावबंदी करावि लागत आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्याच्या नावावरील पीक विम्याची रक्कम दुसऱ्यांनी पळवून नेली, त्यांच्यावर कारवाईची मागणीही आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
जिल्ह्यात विशेषतः रावेर तालुक्यात केळी पीक विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांमध्ये जन आक्रोश सुरू आहे, आमदार, खासदार,मंत्री, पुढारी याना गावबंदी केली जात आहे तालुक्यातील तांदलवाडी, विवारा, बलवाडी, चिनावल,निंभोरा सह तालुकाभरात गावबंदी व जन आक्रोश सुरू असताना तालुक्यातील अनेक गावांत शेतकऱ्यांच्या शेती उताऱ्याला शेतकऱ्यांच्या बोगस सह्या करून, स्टॅम्प व इतर लागणारे कागदपत्रे यावरही बोगस सह्या करून शेतकऱ्यांचे केळी पीक विम्याचे करोडो रुपये हडप केले.
कोचुर परिसरात केळी पीक विम्यात कोट्यावधींचा महाघोटाळा
रावेर तालुक्यातील कोचुर येथील काही लोकांनी फैजपूर, चिनावल, वडगाव,जानोरी, चीचटी, कुंभारखेडा, विवारा,रावेर, जिन्सी आभोडा, आशा अनेक गावातील अनेक शेतकऱ्यांच्या शेती उताऱ्यावर बोगस कागदपत्रांद्वारे लाखो रुपये हडप केले ,यात महिलांचाही समावेश आहे. यात एकाच उताऱ्यावर २८ नावे असलेल्या उताऱ्याला बनावट कागदपत्रे लावून V पा#ल नामक व्यक्तीने लाखो रुपये हडपले, फैजपूर व चिनावल येथील शेतकऱ्यांचे कोचुर शिवारात असलेल्या शेती उताऱ्यावर खोट्या सह्या करून केलेल्या कागदपत्रांच्या आधारे कोट्यावधी रुपये काढले असून त्यातील काही शेतकऱ्यांना बोंबाबोंब झाली म्हणून शटलमेंट करून रक्कमा परत करण्याचे ही प्रकार सुरू आहे.
शिंदखेड्यात लाखो रुपये हडप
तसेच रावेर जवळच्या पाल रोडवर असलेल्या शिंदखेडा गावातील तिघांनी कित्येक शेतकऱ्यांच्या शेती उताऱ्याला पीक विम्याला लागणारे स्टॅम्प व इतर कागदपत्रांवर शेतकऱ्यांच्या बोगस सह्या करून ती कागदपत्रे जोडून कोट्यावधी रुपये हडप केले. या टोळीत आज रोजी शिंदखेडा येथे राहात असलेला पण मूळचा बऱ्हाणपूर जवळील एका गावातील व्यक्ती असून त्यांचे रावेर मार्केट मध्ये दुकान असलेल्या व्यक्तीचा समावेश आहे. या लोकांनी परिसरातील कित्येक शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपये हडप केले आहेत.
पूर्वी विम्याचे काम करणाऱ्या बक्षीपुरच्या व्यक्तीचे कारनामे
रावेर जवळील बक्षीपुरचा रहिवासी असलेल्या व्यक्तीने रसलपूर येथील शेतकऱ्याच्या खिरोदे प्र. रावेर शिवारातील एकत्रित शेती उताऱ्यावर दुसऱ्यांच्या हिस्स्यावर बोगस कागदपत्रे तयार करून रावेर येथील नातेवाईक असलेल्या व्यक्तीच्या नावावर खोट्या सह्या करून केळी पीक विम्याची रक्कम काढून हडप केली
यात मुक्ताईनगर परिसरात विमा कंपनीत पूर्वी काम करीत असलेल्या व्यक्तीचा समावेश आहे, पूर्वी मुक्ताईनगर मध्ये विमा कामात बोगस कामे करीत होता म्हणून त्याची आमदारांकडून चांगलीच कानउघाडणी झाली होती. या व्यक्तीला विम्याची सर्व माहिती असल्याने यांनी शेतकऱ्यांच्या शेती उताऱ्यावर लाखो रुपये काढून हडप केल्याची माहिती मिळत असून किती शेतकऱ्यांच्या शेतीवर यांनी पीक विम्याचे किती रुपये हडप केले या बाबत उघड होईलच
योग्य व आवश्यक त्या शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा पीक विमा मिळालेला नाही, परन्तु ज्यांच्याकडे शेती नाही अशांनी बनावट कागदपत्रे तयार करून शेतकऱ्यांचे केळी पीक विम्याचे करोडो रुपये हडप केले , पीक विम्याची रक्कम हडप करणाऱ्या टोळ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा