रावेर

गाते येथे ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी जोमात, पण कौटुंबीक कलहाने कुटुंबीय मात्र कोमात

तासखेडा, ता. रावेर. मंडे टू मंडे न्युज,अनिल इंगळे। रावेर तालुक्यातील सावदा रेल्वे स्टेशन जवळच असलेल्या गाते गावात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच सुरू झाली आहे. येत्या १८ तारखेला म्हणजेच ३ दिवसावर येवून ठेपलेल्या निवडणुकीमुळे गावचे वातावरण चांगलेच तापल्याचे बघायला मिळत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांनी जोमाने कामाला लागून शर्तीचे प्रयत्न करतांना दिसत आहे.

यात महत्वाचा भाग म्हणजे गावातील मतदारांना खुश कसे करता येईल या साठी नव नविन उपाय वापरण्यात येत असुन यात सर्वात जुना आणी प्रभावशाली ठरणारा उपाय म्हणजे पार्टी होय. आता पार्टी म्हटले की त्यात थंडी चहा अर्थातच दारु ही महत्वाची समजली जात असुन याच दारुचा पाहुणचार देवून काही मतदात्यांचे मन जिंकण्याचे काम केले जात आहे. मात्र या सर्व प्रकारामुळे व्यसनाधीन व्यक्ती मोफत मिळत असलेल्या दारुचा मनसोक्त आनंद घेत दारूची गळालेव्हल येई पर्यत सेवन करत असल्याने व बऱ्याच रात्री पर्यत चालत असलेल्या पार्ट्यामुळे कौटुबीक कलहाच्या घटना अधिक प्रमाणात घडत असल्याचे काही सुज्ञ नागरिकांव्दारे बोलले जात आहे.


सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाहीजे ती दारू हातभट्टी, देशी, विदेशि सर्व प्रकारच्या दारुंचा स्टॉक हा अवैधरित्या उघडपणे गावामध्येच विकला जात असल्याने जणू कसे अवैध रित्या विक्री करणाऱ्यांना कुणाचा धाक उरला नसावा किंवा शासनानेच यांना मंजुरी दिली असावी असे बोलणे काही चुकीचे ठरणार नसल्याचे बोलले जात आहे. मात्र या असल्या प्रकाराने गावामध्ये वाद निर्माण होऊ शकतो , या किरकोळ वादामुळे निवडणुकीत वाद ही निर्माण होऊ शकतात, याची खबरदारी घेणे तितकेच महत्वाचे आहे. त्या साठी सर्रास होत असलेल्या अवैध दारू विक्रीला आळा बसेल काय? असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे .

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!