विवरा खु।। ग्राम विकास अधिकाऱ्यांची चौकशीला दांडी, मागितला आठ दिवसांचा वेळ
ऐनपूर, ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज.विजय के अवसरमल। रावेर तालुक्यातील विवरा खु।। येथे सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात १४ वा वित्त आयोगाचा अठ्ठावीस लाखाचा निधी विविध कामांवर खर्च करतांना कामावर एकही मजूर न लावन्याचा विक्रम करून दाखविनारा ग्राम विकास अधिकारी अतुल पाटील याने आज आजारी असल्याचा बहाणा करून चौकशीलाच दांडी मारल्याने पंचायत समिती प्रशासनाला चौकशी करता आलेली नाही.
अखेर प्रशासनाला तक्रादारास पत्र पाठवून चौकशीसाठी आठ दिवसाचा वेळ मागून सहा फेब्रुवारीस पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसू नये अशी विनंती करावी लागली आहे. तक्रारदार शेख नजमुद्दीन शेख मुनिर यांचेशी संपर्क साधला असता, आठ दिवसात प्रशासनाने चौकशी करून अतुल पाटील यांच्यावर योग्य ती कारवाई न केल्यास आठ दिवसांनंतर प स कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल,तसेच अतुल पाटील यांनी या पूर्वी रावेर व मुक्ताईनगर तालुक्यात केलेल्या ग्रा प च्या करभाराचीही चौकशीसाठी पाठपुरावा केला जाईल,अशी प्रतिक्रिया दिली आहे.