भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

खिर्डी येथे उद्दिष्ट अभावी घरकुल योजनेस पात्र लाभार्थी अजूनही वंचित

खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। रावेर तालुक्यातील खिर्डी खु येथील ग्रामपंचायत अंतर्गत सन २०१९ मध्ये २४१ लाभार्थ्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज सादर केले होते.संबंधित लाभार्थ्यांचे नाव पंतप्रधान आवास योजनेच्या ‘ब’ यादी मध्ये पात्र लाभार्थी म्हणून नोंद असूनही त्यांना गेल्या दोन तीन वर्षापासून अद्यापही शासनाचे घरकुल योजना निर्मितीचे उद्दिष्ट अभावी संबंधित अधिकारी व कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत असून ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

तसेच आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या नागरिकांना हक्काचा निवारा उपलब्ध व्हावा याउद्देशाने ग्रामीण व शहरी भागात शासनाने पंतप्रधान आवास योजना सुरू केली आहे.तसेच ज्या लोकांना खरोखर घरकुलाचे आवश्यकता आहे अशा लोकांची शासनाने जिओ ट्रॅकिंगच्या माध्यमातून सर्व्हे करून घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा.तसेच १८ मार्च शनिवार रोजी झालेल्या अवकाळी वादळ वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली असता अनेक गोर गरीब लोकांच्या घरावरील टिन व पत्रे उडाल्याने पत्रांवरील दगड कोणाच्या अंगावर न पडल्याने जीवितहानी झाली नाही मात्र पावसाचे पाणी घरात पडलेमुळे पूर्ण घरामध्ये पाणीच पाणी जमा झाले असून त्यांचे संसारोपयोगी साहित्य व अन्नधान्य पावसाचे पाण्याने भिजले असून घरात चिखल झाल्याने त्यांना रात्रभर घरातील पाणी बाहेर फेकण्यात त्यांची त्रेधातिरपीट उडाली हे मात्र खरे.


तसेच सदरील कुटुंबीयांना घरकुल योजनेंतर्गत जर हक्काचे घर मिळाले असते तर त्यांचेवर पावसाचे पाण्यात भिजण्याची वेळ आली नसती? तसेच शासनाने या गोष्टीचा गांभीर्यपूर्वक विचार करून पंतप्रधान आवास योजनेचे उद्दिष्ट मंजूर करून जे पात्र व गरजू लाभार्थी आहे त्यांची योग्य ती चौकशी करून त्यांना घरकुल योजनेचा लाभ त्वरित मिळवून द्यावा अशी मागणी खिर्डी येथील लाभार्थीयांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!