भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

भारतीय जनता पार्टी रावेर तालुका कार्यकर्ता मेळावा संपन्न

ऐनपूर,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज,विजय के अवसरमल। रावेर तालुक्यातील तामसवाडी येथे ओंकारेश्वर मंदिर या ठीकाणी आज आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका संदर्भात भारतीय जनता पार्टी तालुका रावेर कार्य कर्ता मेळावा श्री क्षेत्र ओंकारेश्वर मंदिर तामसवाडी येथे संपन्न झाला

या बाबत अधिक माहिती अशी की ,भारतीय जनता पार्टी तालुका रावेर कार्यकर्ता मेळावा श्री क्षेत्र ओंकारेश्वर मंदिर तामसवाडी येथे संपन्न झाला. सदर मेळाव्यात जिल्हा परिषदेच्या सहा गटातील आढावा व बारा पंचायत समिती गणांचा आढावा घेण्यात आला पक्ष संघटन तालुक्यातील बुथ रचना व आगामी सेवा व शासन पंधरवाड्यात करायचे कार्यक्रम व आगामी येणाऱ्या निवडणुका विविध विषयांवर खासदार रक्षा खडसे यांनी मार्गदर्शनपर भाषणातून म्हणाले आपल्या केद्र सरकारच्या योजना प्रत्येक गैरगरीब माणसा पर्यंत गेल्या पाहिजे तसेच आमदार गिरीष महाजन यांनी आपल्या भाषणात म्हणाले की आपण हेवे दावे न करता पक्ष ज्यांना टिकीट देईल त्याना निवडुन आणा जिल्ह्यात आपला पक्षच्या ४५ ते५० जागा सहज जिंकु , केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटका पर्यत जातो की नाही हे प्रत्येक कार्यकर्त्यानी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचले की नही बघीतले पाहीजे त्याच्या काय अडचणी आहे बघीतल पाहीजे. आज पासुन कामाला लागा. तसेच रमजीपुर येथेल अनेक कार्यकर्त्यांनी आमदार गिरीष महाजन यांच्या हस्ते पक्षात प्रवेश घेतला .

या मेळाव्यात आमदार गिरीष महाजन, खासदार रक्षा ताई खडसे, भारतीय जनता पार्टी चे जिल्हा अध्यक्ष आमदार राजु मामा भोळे, किसान मोर्चाचे अध्यक्ष सुरेश धनके, जिल्हा उप अध्यक्ष नंद कीशोर महाजन, युवा जिल्हा अध्यक्ष श्रीकांत महाजन, जिल्हा उप अध्यक्ष प्रल्हाद पाटील ,तालुका अध्यक्ष राजन लासूरकर, पंचायत समिती मजी सभापती कविता हरलाल कोळी, सावदा शहराध्यक्ष जितेंद्र भारंबे(जे.के.), धनश्री सावळे, अनु जातीचे जिल्हा अध्यक्ष मिलिंद अवसरमल, जितेंद्र पाटील ,शरद महाजन, गोपाल नेमाडे महेश चौधरी, पि के महाजन.तसेच अनेक जि.प . सदस्य पंचायत समिती सदस्य बुथ प्रमुख व कार्य काय कर्ता उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष राजन लासुरकर यानी केले व सुत्र संचालन के सी . पाटील व वासुदेव नरवाडे यानी केले

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!