रणगांव येथे एकविरा देवीचा जन्मोत्सव साजरा.
तासखेडा.ता. रावेर,मंडे टू मंडे न्युज. अनिल इंगळे।
रावेर तालुक्यातील रणगांव येथे दर वर्षा प्रमाणे आज दि.२८-०३-२०२३ वार मंगळवार चैत्र शुद्ध सप्तमी दिना निमित्त एकविरा देवीचा जन्मोत्सव म्हणुन साजरा केला गेला.
या मंदिराचे एक वेगळे वैशिष्ट म्हणजे हे मंदिर पुरातन काळापासून असुन २०-०४- २०१७ रोजी गाव वर्गणी गोळा करून मंदिर उभारून एकविरा देवीची स्थापना करण्यात आली.या ठिकाणी अश्या पद्धतीचे कार्यक्रम केले जातात. या मंदिराच्या जागेला काणटोच्या देव म्हणुन देखिल ओळखले जाते.
सालाबादाप्रमाणे गावमध्ये एकविरा देवीच्या मंदिरा मध्ये सामाईकरित्या पुजा अर्चना करुण प्रसादारुपि संपूर्ण गावाला गाव वर्गणीतून जेवनाचा कार्यक्रम आयोजित केला जात असुण या कार्यक्रमाला गावातून नागरिक मोठया संख्येने सहभागी होवून गावातील एकोप्याचे चित्र दिसून येते.