तापी परिसरात रानडुक्करांचा हौदस. शेतकरी चहुबाजूंनी आर्थिक संकटात
तासखेडा.ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज,अनिल इंगळे। रावेर तालुक्यातील तापी परिसरात गेल्या काही दिवसांपासून रानडुक्करांनी शेतकऱ्यांचे मक्याच्या पिकासह केळीच्या बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केल्याचे चित्र समोर येत असुन .आधी सी एम व्हि रोगाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आता त्याच पाठोपाठ करपा रोगाने आपल्या पाऊल खुना मांडायला सुरुवात केली असता त्यात आता अजून भर पडली ती म्हणजे रानडुक्करांव्दारे होत असलेल्या नुकसानाची.
एक वेळेस सी एम व्हि रोगावर किंवा करपा रोगावरती फवारणी तसेच विविध अश्या उपाय योजना केल्यावर काही प्रमाणात त्या रोगावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. मात्र रानडुक्करांनी केलेल्या नुकसानाच्या पिकावर कुठलाही उपाय नसतो. कारण मक्यांचा धांडा असो वा केळीचे खोळ ते जमिनदोस्त करित असल्यामुळे शेतकरी चहुबाजूंनी आर्थिक सकंटात सापडला आहे.
संध्याकाळी बघुन गेलेल्या शेतातील पिकाला सकाळी जमिनदोस्त झालेले बघीतल्या नंतर शेतकऱ्यांनवर आभाळ कोसळल्या सारखे वाटत आहे. कारण महागाईच्या वाढत्या संकटामुळे अन्य वस्तुसह शेतीला लागणारे सर्व साहित्य बि -बियाने फवारणी किरकनाशकासह दैनंदिन वस्तु महागल्या असुन सुद्धा शेतकरी हा सकंटावर मात करत आपली शेती कसत असतो मात्र अश्या पद्धतीने होत असलेल्या नुकसानाला आळा घालण्यासाठी शक्य होईल तितक्या वेळेपर्यत पहारा देऊन सुद्धा होत असलेल्या नुकसानामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तरी संबधीत विभागाने याकडे लक्ष देवून यावर योग्य त्या उपाय योजना करून शेतकऱ्यांना अर्थिक संकटातून बाहेर काढवे अशी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे.