सावदा लाच प्रकरण : दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना अटक, कुटुंबातील व्यक्तींना गुन्ह्यात सह आरोपी न करण्यासाठी लाच
जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा: कुटुंबातील व्यक्तींना 376,363 च्या गुन्ह्यात सह आरोपी न करण्यासाठी 15,000 रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी सावदा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड व सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास दादाराव इंगोले याना जळगाव येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने दुपारच्या सुमार अटक करून जिल्हापेठ पोलिस स्टेशनला ठेवण्यात आले असून उद्या त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे DYSP शशिकांत श्रीराम पाटील यांनी “मंडे टू मंडे न्युज” शी बोलताना सांगितले.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार यांचा मुलगा नामे आकाश कुमावत याचे विरुद्ध सावदा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.0136/2022 भादवि कलम-363, 376 (2),(एन) पोस्को व कायदा कलम 4 अन्वये दि.24/07/2022 रोजी गुन्हा दाखल असुन सदर गुन्ह्यामध्ये तक्रारदार यांच्या मुलाला दि.27/08/2022 रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर तक्रारदार हे आपल्या मुलास भेटणेसाठी सावदा पोलीस स्टेशन येथे जाऊन सदर गुन्ह्याचे तपास अधिकारी पोउनि.गायकवाड यांना भेटले असता यांनी सांगितले की तुमचा मुलगा, मुलीस घेवून ज्यांच्या घरी थांबला होता
त्यात तुम्ही स्वतः,तुमची पत्नी, भाऊ व तुमची बहीण अशांना सदर गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी पोलिस उप निरीक्षक समाधान गायकवाड यांनी तक्रारदाराकडे दि.30/08/2022 रोजी पंचासमक्ष प्रथम 60,000/ रुपये व तडजोडीअंती 15,000/रुपये लाचेच्या रकमेची मागणी करून सदर लाच रक्कम मिळविण्याचा प्रयत्न केला व सहाय्यक पोलिस निरीक्षक देविदास इंगोले यांनी गायकवाड यांना सदर लाच मागणीस प्रोत्साहन दिल्याने समाधान गायकवाड, वय-३२, पोलीस उप निरीक्षक, सावदा पोलीस स्टेशन वर्ग-2 रा.सावदा, ता.यावल जि.जळगांव. देविदास दादाराव इंगोले, वय-५२, सहा.पोलीस निरीक्षक,सावदा पोलीस स्टेशन वर्ग-2 रा.सावदा. ता.रावेर जि.जळगांव
दोघांविरुद्ध आज दि.01/11/2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली असून त्यांना जळगाव येथील जिल्हापेठ पोलिस स्टेशनला ठेवण्यात आले असून उद्या त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे DYSP शशिकांत श्रीराम पाटील यांनी “मंडे टू मंडे न्युज” शी बोलताना सांगितले. सापळा पथकात DYSP शशिकांत श्रीराम पाटील, PI.संजोग बच्छाव, स.फौ.दिनेशसिंग पाटील,पो.ना.बाळु मराठे,पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.राकेश दुसाणे हे होते.