ब्रेकिंग : रावेर तालुक्यात तरुणाचा खून, कारण अद्याप गुलदस्त्यात
रावेर, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। रावेर तालुक्यात संजय पावरा नामक तरुणांचा दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना आज शनिवारी सकाळी उघळकीस आली
मिळालेल्या माहिती नुसार रावेर तालुक्यातील सातपुड्यातील निमड्या या आदिवासी भागातील गावापासून काही अंतरावर तरुणांचा खून झाल्याची घटना आज सकाळी उघळकीस आली खून झालेल्या तरुणाचे नाव संजय पावरा वय ३२, असल्याची माहिती मिळत आहे. त्याचा कोणीतरी अज्ञात इसमाने डोक्यावर ,तोंडावर दगडाने ठेचून चेहरा व डोके छिन्न विच्छिन्न करून खून केला .खुनाचे कारण अद्याप गुलदस्त्यात असून घटना स्थळी dysp डॉ कुणाल सोनवणे, रावेर पोलीस निरीक्षक कैलास नागरे ,पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे सह पोलीस कर्मचारी दाखल झाले असून पुढील तापत करीत आहेत.