ब्रेकिंग : रावेर शौचालय घोटाळा : आणखी नऊ जणांना अटक , आरोपींची संख्या वाढणार!
रावेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। रावेर पंचायत समितीत बहूचर्चेत असलेल्या शौचालय घोटाळ्यात २४ आरोपींना अटक करण्यात आली होती आज पुन्हा ९ जणांना अटक करण्यात आल्याने आरोपींची संख्या ३३ झाली आहे.
या कारवाईने खळबळ उडाली आहे.यात आणखी अनेकांचे पाय खोलात असून आरोपींची संख्या आणखी वाढणार असल्याचे सांगितले जाते.
राज्यभरात चर्चेत असलेल्या रावेर पंचायत समितीतील शौचालय घोटाळ्यात २४ आरोपींना अटक करण्यात आली होती.या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात रावेर तालुक्यातील अजून ९ जणांना वेगवेगळ्या गावांमधून रावेर पोलीसांनी अटक केली आहे. यात ललित सोनार (निंभोरा), बाळु रतीराम कोळी (रणगाव),गोकुळ करुले (अटवाडे), विश्वनाथ कोळी (रायपुर), प्रवीण इंगळे (रावेर), भूषण पाटील (धामोडी), गोकुळ रुले (मस्कावद सिम), युवराज बोदडे (निंभोरा) आणि रविंद्र पाटील (मोरगाव) अशा नऊ जणांना आज अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणात एकुण ३३ जणांना अटक करण्यात आली आहे. या बहुचर्चित शौचालय घोटाळा प्रकरणात अजून बऱ्याच मोठमोठ्या लोकांची नवे चर्चित असून आणखी कोणाकोणाला अटक होणार या कडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.