लाच भोवली : कंत्राटदाराकडून लाच मागितल्याने रावेर वन परिक्षेत्रीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात !
रावेर, मंडे टू मंडे वृत्तसेवा : तालुक्यातील वनविभागातील शासकीय कामे एका कंत्राटदाराने घेतली होती या दोन्ही कामांची बीले पास करण्यासाठी रावेर वन परिक्षेत्रीय अधिकारी याने १ लाख १५ हजार रूपयांची लाचेची मागणी केल्याने याच्याविरुद्ध लाचलुचपत विभागाच्या पथकाने कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत असे की, रावेर वन परीक्षक अधिकारी मुकेश हरी महाजन वय ४५, रा. रावेर ता.जि.जळगाव यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवाशी शासकीय कंत्राटदार तथा तक्रारदार यांना जळगाव जिल्ह्यातील वनविभागकडून रावेर तालुक्यात ए.एन.आर. रोपवन अंतर्गत त्यांनी चेनसिंग फेनसिंग व गेटचे काम ऑनलाईन ई-टेन्डरींगच्या पध्दतीने मिळालेल्या कामांपैकी दोन काम पुर्ण केले होते. कामाचा त्यांना अद्याप धनादेश मिळालेला नव्हता. या बिलांच्या धनादेशाच्या मोबदल्याचे वन परिक्षेत्रीय अधिकारी मुकेश हरी महाजन यांनी ५ टक्के कमिशनप्रमाणे १ लाख ३० हजार रूपयांची मागणी केली. तडजोडी अंत १ लाख १५ हजार रूपयांची मागणी केली. तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी लोकसेवक मुकेश हरी महाजन याच्यावर रावेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरील कारवाई नाशिक एसीबीचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक एन.एस.न्याहळदे, पोलिस उपअधीक्षक सतीश डी.भामरे (वाचक) यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत श्रीराम पाटील यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, एएसआय दिनेशसिंग पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, हवालदार शैला धनगर, नाईक मनोज जोशी, नाईक सुनील शिरसाठ, पोलिस नाईक जनार्धन चौधरी, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, कॉन्स्टेबल महेश सोमवंशी, कॉन्स्टेबल नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ आदींच्या पथकाने केली.