रावेर येथे बौद्ध धम्मीय सामुहिक सोहळा संपन्न
तासखेडा,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज.अनिल इंगळे । जळगांव जिल्ह्यातील रावेर येथे दि.१४ /५/२०२३ रविवार रोजी रावेर येथिल सरदार जी.जी हायस्कुल व ज्युनियर कॉलेज मध्ये फुले शाहु आंबेडकर बहुउद्देशीय संस्था रावेर याच्या वतीने बौद्ध धम्मीय सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. यात एकूण ४५ नववधुवर विवाह बंधनात बांधली जावून उत्स्फूर्त प्रतिसादाने सामुहिक विवाह सोहळा संपन्न झाला.
या विवाह सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. दिपरत्न देविदास तायडे (राजरत्न तायडे हेल्पिंग फाऊंडेशन. भुसावळ) हे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटन मा. गौतम तायडे. सहा. पोलीस निरिक्षक मालेगाव- किल्ला पोलीस स्टेशन यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला पुंज भन्ते धम्मरत्न व त्यांचा पवित्र श्रामनेर संघ उपस्थित होता. या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष शैलेन्द्र जाधव, जिल्हा सरचिटणीस मा. सुमंगल अहिरे तसेच भारतीय बौद्ध महासभा यांचे पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते.