निंभोरा सिम येथे लिम्पी आजाराने बैलाचा मुत्यु
ऐनपूर,ता.रावेर,विजय के अवसरमल। गेल्या अनेक दिवसांपासून संपुर्ण राज्यासह तालुक्यात गुरांवर लिम्पी आजाराची साथ आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे गाय बैल मोठ्या प्रमाणात मृत्यु झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे त्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे
सवित्तर वृत्त असे की रावेर तालुक्यातील निभोरा सिम या गावामध्ये लिम्पी आजारामुळे शेतकऱ्यांचे गाय,बैल मृत्यु होत आहे तसेच दिनांक १४ रोजी निभोरा सिम येथे प्रविण भागवत सर्वणे यांच्या मालकीचा बैल लिम्पी आजारा मुळे मयत झाला आहे त्याच्यावर उपचार करून सुद्धा बैल वाचु शकले नाहीत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभिजित डावरे यानी गावात येऊन प्रत्यक्ष पाहणी केली तसेच बैलांचा पंचनामा केला काही दिवासा पुर्वी सुध्दा गावात एक गाय लिम्पी आजारामुळे मयत झाली होती, निभोरा सिम गावात लिम्पी आजाराचा शिरकाव मोठ्या प्रमाणावर होताना दिसुन येत आहे त्यामुळे शेतकरी चिंता त्रस्त झाले आहेत यावर शासनाने प्रभावी उपाय करावेत अशी शेतकरी मागणी करत आहेत