रावेर

दोन नंबरचे धंदे बंद झाले नाही तर उलट दोन नंबर वाल्यांकडून हप्ते वाढवुन घेतले : आ.एकनाथराव खडसे

रावेर, जि. जळगाव. मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। रावेर तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर वाढले असून जळगाव जिल्ह्यातील अवैध धंद्यांकडे पोलिस दुर्लक्ष करीत असून तक्रार करूनही बंद झाले नाहीत उलट त्यांचे कडून हप्ते वाढून घेतल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी चे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी केला.

रावेर तालुक्यातील नवनिर्वाचीत सरपंच उपसरपंच तसेच ग्राम पंचायत सदस्य विकासोचे चेअरमन व्हाचेअरमन तसेच सदस्य यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षा तर्फे रावेर शहरातील सैनिक हॉलमध्ये करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादी चे नेते आमदार एकनाथराव खडसे म्हणाले की, तक्रार करूनही दोन नंबरचे धंदे बंद झाले नाही तर उलट दोन नंबरच्या धंद्यांवाल्यांकडून हप्ते वाढवुन घेतले, याकडे जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक यांचे दुर्लक्ष होत असल्याचा मोठा आरोप खडसे यांनी केला .

कार्यक्रमाला राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, माजी आमदार अरुण पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष किशोर पाटील, निळकंठ चौधरी, ओबिसी सेल तालुकाध्यक्ष सुनिल कोंडे रावेर राष्ट्रवादी शहराध्यक्ष महेमुद शेख, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष रेखा चौधरी, सोपान पाटील
शकुंतला महाजन,मुरलीधर तायडे,रमेश पाटील, प्रकाश पाटील, राजेश वानखेडे,दिपक पाटील, प्रल्हाद बोंडे,
सौ. वंदना चौधरी, सचिन पाटील, मायाबाई बार्‍हे,आदी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!