महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरील नागोळी नदीच्या बाजूच्या जुगार अड्ड्याच्या जागेत बदल…! अजनाड रस्त्यावर जुगाऱ्यांची जत्रा जोमात : पोलीस प्रशासन आर्थिक हितसंबंधांच्या ओझ्याखाली ?
मंडे टू मंडे, विशेष प्रतिनिधी। रावेर तालुक्यातील महाराष्ट्र -मध्यप्रदेश सीमेवरील चोरवड/खानापूरच्या दरम्यान असलेल्या नागोळी नदीच्या बाजूला चालणाऱ्या क्लबवर दररोज लाखो रुपयांचा जुगार खेळला जात असल्याचे Video चित्रणासह “मंडे टू मंडे न्युज” ने Video स्टिंग ऑपरेशन करून, तालुक्यातील जुगार साम्राटांचे भक्कम साम्राज्याचे पितळ उघडे केले होते, यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह ? निर्माण झाले होते सदरच्या बातमीने परिसरासह जिल्ह्यात खळबळ उडाली होती, कायद्याचे राज्य आहे की नाही, अशी परिस्थिती दाखविणारे चित्र या मुळे समोर आले होते. मात्र प्रशासनाकडून थातुरमातुर सोडता योग्य ती ठोस अशी कारवाई आज पर्यंत होताना दिसली नाही, एकंदरीत या सर्व प्रकारात वरिष्ठांपर्यंत पाकीट पोहच होत असल्याचे चर्चेवर यामुळे शिक्कामोर्तब झाले हे मात्र नक्की?
“Video स्टिंग ऑपरेशन : महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर जुगार सम्राटाचे साम्राज्य भक्कम : अड्ड्यावर दररोज लाखोंची उलाढाल ! पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह ?” या बातमीची दखल नाईलाजास्तव का होईना पोलिसांना घ्यावी लागली होती, “मंडे टू मंडे” ने वृत्त प्रसिद्ध केल्या नंतर कारवाई दाखवण्याच्या उद्देशाने लाखोंची उलाढाल असलेल्या व ३०० ते ४०० जुगाऱ्यांची जत्रा असलेल्या अड्ड्यावर पोलिसांनी रेड टाकण्याचा बनाव दाखवून चार-पाच जुगाऱ्यांवर कारवाई करून पाच हजार रुपये जप्त केल्याचं ” मॅनेज ” बनाव करत घुळ फेक करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आज पावेतो जुगाराचा अड्डा बिनदिक्कत पणे मात्र, ठिकाण बदलून चालू असून सद्या परिस्थिती अशी आहे की, सदरचा जुगार अड्डा त्या ठिकाणाहून हलवून, त्या ठिकाणा पासून एक किलोमीटर अंतरावर अजनाड रस्त्यावरील नागोळी नदी वरील अजनाड चोरवड शिवारात नागोली नदीजवळील कॅटेवेअर जवळ मोठया जोमात व बिंबोभाट पणे, महिन्याचे पाकीट पोहच करत,सर्वी कडे वाटप करून सुरू असून या सर्व प्रकाराकडे जळगावचे एसपी डॉ.प्रविण मुंढे कुठल्या कारणामुळे दुर्लक्ष करत आहे हा प्रश्न ? परिसरातील नागरिकांना पडला आहे. त्याला पोलिसांकडून खुले अभय असल्यानेच व महिन्याला आर्थिक हितसंबंध जोपासले जात पाकिट पोहच होत असल्याने कोरोना काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी असलेल्या मूळ अड्ड्यावर कारवाईत केली जात नाही. यामुळे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी लावलेल्या कोरोनाच्या निर्बंधामधून यांना सूट दिली गेली आहे का ? असा प्रश्न यानिमित्ताने नागरिकांना पडला आहे.
थातूरबातूर किरकोळ अड्ड्यावर कारवाई करण्याचा आव आणत वरिष्ठांच्या नजरेत कारवाई दाखवण्यात प्रकार चालू असल्याचे शहरात बोलले जात आहे. काल तसाच एक प्रकार घडला असून तालुक्यातील चोरवड येथे सुरू असलेल्या किरकोळ जुगार अड्डयावर पोलिसांनी छापा टाकल्याचे दाखवत १२ जणांवर कारवाई केली मात्र ही कारवाई वरिष्ठांच्या व जनतेच्या नजरेत धूळ फेक केल्याचे स्पस्ट दिसते. चोरवड-अजनाड रस्त्यावरील नागोली नदी जवळील कॅटेवेअर जवळील जुगार अड्ड्यावर ३०० ते ४०० जुगारी खेळत असतात दिवसाला लाखोंची उलाढाल होत असलेल्या मोठ्या जुगार अड्ड्यावर मोठ्या आर्थिक लाभपोटी कारवाई न करता जवळच्याच किरकोळ जुगार अड्ड्यावर कारवाई केली जाते,म्हणजे मोठ्या जुगार अड्ड्याला जास्तीच्या आर्थिक हप्त्यांपोटी संरक्षण दिले जाते,तालुक्यातील अश्या अवैध धंद्यांवर नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक यांच्या विशेष पथकाने मोहीम राबून कारवाई करण्याची मागणी तालुक्यातील नागरिकांकडून वारंवार केली जात असून यासर्व प्रकाराकडे आयजी पथकाची कारवाई होते का की दुर्लक्ष केले जात हे पाहणं महत्वाचे ठरेल…
एकंदरीत पोलीस अधून-मधून जुगार अड्ड्यांवर कारवाईचा बडगा उगारल्याचा देखावा करतात. सर्व काही ठरल्याप्रमाणे होत असल्याने पोलीस छाप्यातून किरकोळ रक्कम जप्त करीत प्याद्यांवर कारवाई करण्यात येते; मात्र जुगार अड्डा चालविणारा मुख्य आरोपी मोकळाच राहतो. पोलिसांच्याच कृपाशीर्वादामुळे अवैध धंद्यांना संरक्षण मिळत असल्याचे परिसरातील जुगार अड्ड्याच्या स्टिंग ऑपेशनमुळे पाहायला मिळते. यामुळे आता आयजी पथकाच्या कारवाईची मागणी परीसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. तूर्त एव्हढेच..!