भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

चिनावल सेंट्रल बँकेचा भोंगळ कारभार, ग्राहक त्रासले,ग्राहकांना दिल्या जातात जमा झालेल्या जुन्या-खराब नोटा?

सावदा,ता.रावेर,मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। रावेर तालुक्यातील चिनावल येथे असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेत भोंगळ कारभार सुरू असून येथील कर्मचारी ग्राहकांना योग्य सेवा देत नसून ग्राहकांची कामे करण्यास टाळाटाळ करतात .

सावदा येथून जवळच असलेल्या चिनावल येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेत लाखो रुपयांचा रोजचा व्यवहार होत असून आजू बाजूच्या गावांसाठी ही बँक महत्वाची मानली गेली आहे, चिनावल हा परिसर केळी पिकवण्या साठी प्रसिद्ध आहे, बँकेत व्यवहार करत असताना बँकेचे कर्मचारी काम कुचर पणा करीत असून ग्राहकांचे पास बुक भरून देण्यासाठी टाळाटाळ करतात दहा-दहा,पंधरा-पंधरा दिवस पास बुक भरून देत नाहीत ग्राहकांशी उद्धट पणाने वागतात या संदर्भात या पूर्वी बातमी प्रसिद्ध झाली होती या वेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी सुद्धा केली होती.परंतु आजही जैसे थे परिस्थिती आहे. तक्रारी करूनही काहीही फरक पडत नसल्याने ग्राहक कमालीचे त्रासले आहेत.

ग्राहकांना दिल्या जातात जमा झालेल्या जुन्या-खराब डाग लागलेल्या नोटा !
दरम्यान ,अधिक माहिती घेतली असता असे समजते की, बँकेत जमा झालेल्या जुन्या खराब डाग लागलेल्या नोटा काही ग्राहकांना जबरजस्त देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे ग्राहका कडून सांगण्यात आले,ह्या नोटा बँकेत जमा झालेल्या नोटा की,कमी किमतीत घेतलेल्या नोटा? हे कर्मचारी कोण?

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!