भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

खिर्डी खु येथे मोबाईल रेंज अभावी नागरिक त्रस्त, 4G सेवा स्लो स्पीड

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

खिर्डी ता.रावेर (प्रतिनिधी): रावेर तालुक्यातील खिर्डी खु.येथे नवीन गावठाण परिसरात मोबाईल कंपनीचे टॉवर असून त्या ठिकाणी विविध मोबाईल कंपन्यांची नेटवर्क प्रोव्हायडर यंत्रणा बसवलेली आहे ,गेल्या अनेक दिवसांपासून मोबाईलची  रेंज वारंवार गायब होत असते. हायस्पीड 4Gइंटरनेट सेवा  उपलब्ध असल्यावर सुद्धा  इंटरनेट स्लो स्पीड ने काम करीत  असल्याने ऑनलाईन अभ्यासिका वर्ग,तसेच ऑनलाईन परीक्षा देण्यास विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

रेंज मिळत नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे शेतकरी ,व्यापारी यांना केळी कापणी,तसेच मालवाहतूकीसह अन्य कारणांमुळे संपर्काअभावी ताळमेळ बसत नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे,मोबाईल नेटवर्क रेंज मिळत नसल्याने नुकसानीसह आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे सध्या पुन्हा कोरोना महामारी संकट काळ असल्याने मात्र गावातील मोबाईल टॉवर्स शोपिस ठरले असून मोबाईल ला रेंज मिळत नाही व मधेच अवेळी फोन कट होत असल्याने संभाषण अभावी नागरिकांचा संताप वाढत असून  संबंधित मोबाईल कंपनीच्या सिम कार्ड चेंज करण्याची वेळ आली असल्याचे चित्र दिसत आहे. कस्टमर केअर कडे वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नाही तरी दुरसंचार,जिओ विभागाचे वरिष्ठ अधिकारीसह संबंधितांनी तातडीने लक्ष देवून जनसामान्य जनतेसह विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी यांना नाहक होणाऱ्या त्रासातून मुक्त करण्यासाठी तात्काळ प्रयत्न करावेत अशी मागणी सुज्ञ नागरिकांसह  सामाजिक कार्यकर्ते भिमराव कोचुरे यांनी केली आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!