निंभोरासीम येथे कानिफनाथ महाराज यात्रोत्सव निमित ग्रामस्थांची स्वच्छता मोहीम
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज, भिमराव कोचुरे। रावेर तालुक्यातील निंभोरा सिम या गावातील यात्रा कोरोना काळात गेली दोन वर्षेपासून बंद होती.या वर्षी दिनांक २१ व २२ रोजी निंभोरा सिम येथे कानिफनाथ महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहात भरत असून वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा खंडित न करता दोन वर्षाच्या कालखंडानंतर यावर्षी यात्रोत्सव भरणार आहे.
तसेच यात्रेचे औचित्य साधुन यावर्षी ग्रामस्थांसह ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य यांनी जनतेने निवडून दिलेले आहेत जनतेने नवीन चेहऱ्यांना संधी देऊन त्यांच्या हाती गावाची सुत्रे दिलेली आहेत त्या अनुषंगाने गावात यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांना कोणत्याच प्रकारची समस्या उद्भवणार नाही याची लक्ष देऊन गावात स्वच्छता केली त्यावेळी सरपंच अनिल कोळी, उपसरपंच उमेश वरणकर, सदस्य किरण चौधरी, प्रवीण चौधरी, दिलीप सवरणे , ग्रामपंचायत शिपाई संजय कोळी व ग्रामस्थ गौरव पाटील, नारायण सवर्णे, प्रवीण सवर्णे तसेच गावातील तरुण मित्रमंडळी यांनी खूप परिश्रम घेतले.